अवधूत गुप्ते यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध होऊन म्युझिकल फाऊंटन शुभारंभ देखील होईल-मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी, दि.११ फेब्रुवारी 
सावंतवाडी शहरातील मोती तलावात म्युझिकल फाऊंटन उभारण्यात येणार आहे त्यामुळे शहरात महोत्सव आयोजित केला जाईल. अवधूत गुप्ते यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध होऊन म्युझिकल फाऊंटन शुभारंभ देखील होईल असा विश्वास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी शहरातील मोती तलावात म्युझिकल फाऊंटन बसविण्यासाठी साडे चार कोटीचा निधी मंजूर केला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून हा महोत्सव घेण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथील संस्कृती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी केली. दरम्यान या कार्यक्रमासाठी गायक अवधूत गुप्ते यांनी उपस्थित रहावे, त्याच्या गाण्याच्या तालावर कारंजा सुरू करूया, असे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी येथे शासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा समारोप आज करण्यात आला. यावेळी श्री. केसरकर बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपजिल्हाधिकारी (साप्रवी) श्री मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय दंडाधिकारी म्हस्के पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, तहसीलदार श्रीधर पाटील, आर्किटेक्ट अमित कामत आदी उपस्थित होते.