वेंगुर्ले,दि.११ फेब्रुवारी
वेंगुर्ल्याच्या विकास सुरू आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढत आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी जल बांदेश्वर पासून रेस्ट हाऊस पर्यंतचा रस्ता मंजूर केला आहे. वेंगुर्ल्यात माझे पक्षापलीकडेचे घरघुती नाते संबंध आहेत. येथील सर्व महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी जो काय निधी आवश्यक आहे तो देण्यात येईल विकास असेल तिथे राजकारण नाही हे सर्वांनी ठरवले पाहिजे. नवीन सीआरझेड ऍक्ट प्रमाणे कांदळवन मध्ये इको टुरिझमला परवानगी देण्यात आली आहे. मांडवी येथील नगरपरिषदेच्या तलावात पर्यटनाच्या दृष्टीने तरंगती कॉटेजेस उभारण्यात येतील. आपली जागा विकू नाकात तेथे स्वतःचे प्रकल्प तयार करा. तुमचा आमदार व मंत्री म्हणून १०० टक्के तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे दिले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर वेंगुर्ले शहरातील सुमारे ३ कोटी ५७ लाखांच्या विकासकामांची भूमीपूजने आज शनिवारी रोजी दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मांडवी खाडी येथील कॉर्नर सभेत मंत्री केसरकर बोलत होते. सर्वप्रथम मंत्री केसरकर यांच्या हस्ते कॅम्प येथील नगरपरिषद जलतरण तलावाचे विकसन करणे, फळ संशोधन केंद्र गडगा (पोलीस ठाण्या समोर) ते समीर गेस्ट हाऊस पर्यंत जाणारा रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करणे, नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजना सुधारित करण्यासाठी शहरातील अस्तित्वात वितरण वाहिन्या नव्याने घालणे (पहिला टप्पा), नगरपरिषद हद्दीतील इम्युलेट कनसेप्शन चर्च वेंगुर्ला स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, आईस फॅक्टरी ते गिरगोल फर्नांडिस (गजीबो) पर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, वेंगुर्ला झुलता पूल ते बंदर पर्यंत जाणार रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विविध ठिकाणी यावेळी उपस्थित मान्यवरात सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा संघटक रुपेश पावसकर, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजन रेडकर, शहर प्रमुख उमेश येरम, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, युवासेना शहर प्रमुख संतोष परब, कोचरा सरपंच योगेश तेली, मितेश परब, परेश मुळीक, समाधान बांदवलकर, कौशिक परब, गणपत केळुसकर, प्रकाश मोठे, वेंगुर्ले शहर अल्पसंख्याक महिला असेल संघटक शबाना शेख, महिला शहर संघटक रसिका राउळ, प्रभाकर पडते, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, भाजपचे जयंत मोंडकर, प्रणव वायंगणकर, भूषण सारंग भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर, माजी नगरसेवक नागेश गावडे, सायमन आल्मेडा, गिरगोल फर्नांडिस, मनवेल फर्नांडिस, दाजी परब, वसंत तांडेल, माजी नगरसेविका श्वेता हुले, वेंगुर्ला बोट मालक संघाचे पदाधिकारी गणपत चोडणकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना केसरकर म्हणाले, नवाबाग येथे भारतातील पाहिले फिशिंगव्हिलेज करायचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देईन. नवाबाग आणि बंदर रोड ला जोडणारे पूल झाले त्याठिकाणी लहान लहान व्यवसाय उभे राहिले त्याठिकाणच्या व्यावसायिकांना एकसारखे स्टोल उभे करून देण्याचा मानस असल्याचेही मंत्री केसरकर म्हणाले.
Home आपलं सिंधुदुर्ग वेंगुर्ल्यात सुमारे ३.५० कोटींच्या विकासकामांची दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन