‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे ‘आरोग्यधाम‘ उपक्रम

वेंगुर्ला,दि.११ फेब्रुवारी

विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेली ‘माझा वेंगुर्ला‘ ही संस्था आता ‘आरोग्यधाम‘ हा आरोग्य व शिक्षणविषयक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी उभादांडा-वरचेमाड येथे होणार आहे. शुभारंभाचे औचित्य साधून त्याच दिवसी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत सीपीपीए या मुंबईस्थित संस्थेच्या सहयोगाने आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर घेण्यात येणार आहे.

आजच्या धावपळीची जीवनशैली, निकृष्ट आहार आणि व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे मनुष्य अनेक दूर्धर आजारांना बळी पडत आहे. अशा आजारांचे वेळीच निदान झाले तर योग्य इलाज होऊ शकतो. यासाठी मुंबईस्थित तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक निमंत्रित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्त तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, रक्तदाब व फुफ्फुसाची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, सर्जिकल आदींची तपासणी केली जाणार आहे. गरजू रूग्णांनी आपली नावनोंदणी राजन गावडे (९४२३३०१३१०) किवा राजन गिरप (९४२३२११९६३) यांच्याकडे करावीत. या तपासणीनंतर आठवड्यातून दोन दिवस कायमस्वरूपी ब्लडप्रेशर आणि शुगर तपासणी करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.