महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन,इशारे दिले नाही तर थेट भिडणारी मनसे

उपरकर यांनी बारा वर्षे इशारे दिले संघटनात्मक कामं केले नाही-मनसेचे पक्षनिरीक्षक गजानन राणे

सावंतवाडी दि.११ फेब्रुवारी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन,इशारे दिले नाही तर थेट भिडणारी मनसे आहे त्यामुळे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बारा वर्षे इशारे दिले संघटनात्मक कामं केले नाही असे मनसेचे पक्षनिरीक्षक गजानन राणे यांनी म्हटले आहे तर राज्य सरचिटणीस संदीप दळवी म्हणाले, उपरकर यांनी बॅनर वर माजी मनसे म्हटले आहे. मनसेच्या नावाने अजुनही दुकान चालवत आहेत,हे नैतिकतेत बसतं का? असा प्रश्न उपस्थित केला.
सावंतवाडी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सेना बैठक, पक्षप्रवेश झाल्यानंतर पक्षनिरीक्षक तथा सरचिटणीस संदीप दळवी व पक्ष निरीक्षक तथा सरचिटणीस गजानन राणे बोलत होते.

यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, जिल्हा सचिव बाळा पावसकर, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर उपजिल्हाअध्यक्ष, गुरुदास गवंडे विधानसभा सचिव सावंतवाडी, सचिन सावंत विधानसभा सचिव कुडाळ, प्रभोद राऊळ वाहतूक सेना अध्यक्ष विक्रोळी, मिलिंद सावंत तालुकाअध्यक्ष सावंतवाडी,हेमंत जाधव कुडाळ तालुकाअध्यक्ष, सचिन पाटणकर सावंतवाडी विद्यार्थी सेना संपर्कअध्यक्ष, राजेश मामलेदार, अतुल केसरकर उपतालुकाध्यक्ष, ग्रा. प. सदस्य, नरेश देऊलकर,अक्षय पार्सेकर, विभागअध्यक्ष काशीराम गावडे, विष्णू वसकर, तसेच साई तळकटकर, अभिजित खांबल, नाना देसाई, अभिमन्यू गावडे, श्रीराम सावंत, संदेश शेट्ये, प्रतिक मालवणकर, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत करून पक्षप्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत सावंतवाडी मध्ये विद्यार्थी सेनेमध्ये आज विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असे पक्ष निरीक्षक संदीप दळवी म्हणाले. ते म्हणाले, परशुराम उपरकर यांनी संघटना वाढीसाठी विशेष काही काम केले नाही, व्यक्ती पुरता पक्ष असत नाही त्यांनी वेळोवेळी आजारी आहोत बाहेरगावी आहोत अशा आम्ही बैठका घेतल्या त्यावेळी कारणे दिली सहानभूती ही सदाकाळ चालत नाही पक्षासाठी काम करणाराच पक्षा मध्ये टिकतो मागील दोन वर्ष आपण पक्षांमध्ये सक्रिय नसल्याचे उपरकर म्हणतात मात्र आता पक्षातून बाहेर गेल्यानंतर ते माजी मनसैनिक असे बॅनर वर लावत आहे हे नैतिकतेला धरून नाही कोणी एकदा संघटनेतून बाहेर पडल्यानंतर त्या संघटनेचा नावाने दुकान चालवत नाही उपरकर ते दुकान चालवत आहे आणि त्यांचे दुकान चालत असेल तर आम्हाला आनंदच आहे. मनसेला चांगली काम करणारे संघटना, वाढवणारे मनसैनिक हवे आहेत .त्यांनी मुळापासून काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. दळवी आणि राणे यांच्यावर पदभार दिल्यानंतर दोन गट पडले म्हणणाऱ्या उपरकरांच्या काळात किती गट होते असा प्रश्नही दळवी ऊ उपस्थित केला.

यावेळी पक्ष निरीक्षक गजानन राणे म्हणाले, गेल्या बारा वर्षांमध्ये परशुराम उपरकर यांनी फक्त आंदोलन आणि इशारे देण्याचं काम केले प्रत्यक्षात संघटना मजबूत करण्याचे काम केले नाही मनसे स्टाईल ही फक्त इशारे देण्याएवढी नाही ती लोकांच्या प्रश्नावर भिडते असे राणे यांनी सांगून उपरकर यांनी पक्षासाठी अपेक्षित काम केले नाही हे पक्षाध्यक्ष राज साहेब यांच्या डिसेंबरच्या दौऱ्यात लक्षात आले. वर्षभर काम करत नसल्याचे उपरकर म्हणत आहेत नवनिर्माण सेनाही प्रत्येकाच्या प्रश्नावर भिडते आणि काम करते असे त्यांनी सांगितले. उपरकर यांनी फक्त आंदोलन आणि इशारे देण्यापलीकडे काही काम केले नाही संघटना बांधणी केली नाही मनसे स्टाईल आंदोलन केले नाही असे ते म्हणाले.
यापुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळावर लढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही राहील असे राणे यांनी सांगितले तसेच आरोग्य, वीज प्रश्न अशा जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे गजानन राणे यांनी सांगितले.