५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन भव्य दिव्य स्वरूपाचे असून याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद

सावंतवाडी,दि.११ फेब्रुवारी 
सावंतवाडी येथील ५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन भव्य दिव्य स्वरूपाचे असून याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दर्शवला आहे.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी ते सिंधुदुर्गात भरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला असल्याने केसरकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सावंतवाडी येथे जिमखाना मैदानावर भरविलेले हे बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत असून समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान तंत्रज्ञान हा या प्रदर्शनाचा विषय ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व भाषा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शिक्षण संचालक राहुल रेखावार, जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक डॉ. राधा अतकरी आदींनी या शिबिरासाठी खास मार्गदर्शन केले असून विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे आणि शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी बालवैज्ञानिक प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी नियोजन केले असून दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांनी या नियोजनात सहकार्य केले आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी राजन पोकळे यांचा मंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

भोसले नॉलेज सिटीचा गौरव !
या भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनामध्ये कोकणातील शैक्षणिक ब्रॅण्ड असणाऱ्या भोसले नॉलेज सिटीनं आयोनाचा भार उचलला आहे‌. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांना यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल सावंतवाडीची मजबूत साथ लाभली आहे. यासाठी या संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. तसेच भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांना गौरविण्यात आलं.

बालवैज्ञानिकांच शिक्षणमंत्र्यांकडून कौतूक
राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते. यात राज्यभरातील तब्बल ४८० वैज्ञानिक प्रतिकृती सहभागी झाल्या आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्यक्ष या वैज्ञानिक प्रतिकृतींची माहिती घेत विद्यार्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली‌. या प्रदर्शनात शेकडो बालवैज्ञानिक सहभागी झाली आहेत. १४ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी खुले असणार आहे. याला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला लाभत आहे.