पालकांनी मुलांचे कलागुण ओळखून त्यांचे भावी करियर ठरवा!शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक! अतूल वार नक्षल ऑपरेशन हेड नागपूर

मुलांनी स्पर्धात्मक परीक्षा भाग घेऊन आला सर्वागीण विकास साधावा

बाळासाहेब पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद सिंधुदूर्ग

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी,दि.११ फेब्रुवारी

आज विदयार्थी यांना स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे .त्यामूळे पालकांनी आपल्या मुलामधील कलागुण ओळखून त्यांचे करियर घडविणे गरजेचं आहे.शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक असतो त्यानें विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे मत निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम वेळी नागपूर येथील नक्षल ऑपरेशन हेडचे अतूल वार यांनी कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी मत व्यक्त केले.

तसेच यावेळी बाळासाहेब पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद सिंधुदूर्ग यांनी पणं विदयार्थी यांना चागल्या प्रकारे मार्गदर्शन केलें. यावेळी ते म्हणाले आज शालेय जीवन हे त्याच्या आयुष्यातील खरी दिशा ठेवणारे केंद्र बिदू आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात टिकण्याचे मनोधर्य टिकविण्याचे आता गरजेचे आहे.असे ते यावेळी म्हणाले.तसेच सावंतवाडी तालुक्यातील निरवडे सारख्या ग्रामीण भागात आदर्शवत विद्यार्थी व स्कूल बनविण्याचे मोलाचे कार्य चंद्रशेखर जैन यांनी केले आहे.

संस्कार नॅशनल स्कूल हे भावी काळात आदर्श वन स्कूल होईल व या विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या पदावर गरुड झेप घेतील अशी आपण आशा व्यक्त करतो असे यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर मनोगत वेळी व व्यक्त केले.शेखर जैन यांनी स्कूल चां सर्वागीण विकास व विद्यार्थी यांना आधुनिक तंत्रज्ञान द्वारे शिक्षण भावी काळात दीले जाईल असे आश्वासन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रम वेळी व्यापीठावर प्रमूख मान्यवर अतूल वार नक्षल ऑपरेशन हेड नागपूर,बाळासाहेब पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग जिल्हा परिषद सिंधुदूर्ग . नरपत जैन अध्यक्ष संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ,शेखर जैन माजी अध्यक्ष ,सतिश पाटणकर, मुख्याध्यापक हेमंत तानवडे, स्कूल कमिटी शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष निलेश बरकुटे, भालचंद्र गोसावी,राजेंद्र राठोड, भाविल जैन जवाहर राठोड, कमिटी स्कूल सचिव अनन्या धावडे, स्नेहा भिसे स्कूल कमिटी सभासद पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळीं या कार्यक्रमाचे आयोजन तेजा मेस्त्री, मनिष सावंत,, प्रियांका शिरसाट तसेच शिक्षक कर्मचारी यांनी केले, यावेळी बेस्ट टीचर अवॉर्ड मनिष सावंत, सुनीता राणे तर बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड स्नेहल गवस यास संस्कार नॅशनल स्कूल च्या वतीने शेखर जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कर्मचारी शिक्षण पुरस्कार धनश्री सोनुरलेकर यांना देण्यात आला .तर सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पायल धनकुटे , व उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार मॉरिस्का डायस यांना देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल तेजा मेस्त्री, मनिष सावंत व सुनिता राणे यांचा खास सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी या प्रशाळेतील माजी शिक्षक व माजी विद्यार्थीयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष सावंत, तर शाळेचा अहवाल मुख्याध्यापक हेमंत तानावडे यांनी वाचला तर आभार प्रदर्शन रुपेश सावंत यांनी केले तर सूत्र संचालन शुभम धुरी यांनी केले.