भविष्यात राज्यात “सेलिब्रिटी स्कूल” ही संकल्पना राबविण्यात येणार-मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी,दि.११ फेब्रुवारी
बालवैज्ञानिक प्रदर्शनातून विद्यार्थ्याची कला जगासमोर जाण्यास मदत होते.भारत वैज्ञानिक क्षेत्रात कुठे ही मागे नाही.स्वताच्या भाषेत शिक्षण घेणारी मुलं यशस्वी झाली आहेत. त्यामुळेच भविष्यात राज्यात “सेलिब्रिटी स्कूल” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत जागतिक स्तरावरील गायक, कलाकार यांच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
ते सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ५१ व्या बालवैज्ञानिक प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते यावेळी यावेळी त्यांनी मुलांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर असल्याचे ही सांगितले.
मंत्री केसरकर यांनी प्रथम विज्ञान प्रदर्शनाला भेट विद्यार्थ्यानी केलेले वैज्ञानिक प्रयोग पाहिले व विद्यार्थ्याचे तोंडभरून कौतुक केले.त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतना मंत्री केसरकर म्हणाले,आगामी काळात आपणास राज्यात “सेलिब्रिटी स्कूल” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत जागतिक स्तरावरील गायक, कलाकार यांच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे,
विज्ञाना प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्याच बरोबर त्यांना शैक्षणिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी आमच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. य
यावेळी केसरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले ही हुशार आहेत, गेली १४ वर्षे येथील मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, त्यामुळे सिंधुदुर्गातील मुलांना सायन्स मधील विविध प्रयोग पाहता यावे व संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांना कोकणची सुवर्णभूमी पाहता यावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या मुलांना समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी जात असताना नियमांचे पालन करून आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्गातील मुलांना पाच दिवस चालणारे हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे सांगितले व सिंधुदुर्गातील भूमिपुत्रांनी विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने सावंतवाडीत येणाऱ्या मुलांचे व सायन्स शिक्षकांचे स्वागत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
या कार्यक्रमाला यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे सह संचालक राहूल रेखावार मुख्याधिकारी सागर साळुंखे महेश चोथे यांनी मार्गदर्शन केले.तर बीकेसी चे अच्युत भोसले यांचा मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ॲड. निता सावंत, बाबु कुडतरकर, आर्किटेक्ट अमित कामत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, म.ल.देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, माजगांव सरपंच डॉ.अर्चना सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर आदी उपस्थित होते.