सांगवे कनेडी येथील माळरानावर संभाजी नगर परिसरात बिबट्याचा वावर…

कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथील माळरानावर संभाजी नगर येथे सुनील दौलतराव सावंत यांच्या घरी रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी मध्य रात्री १ वाजण्याच्या सुमारास बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करीत व्हरांड्यात येऊन गेला.कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुकेश सावंत यांनी दरवाजा उघडताच बिबट्याने समोरच्या माडातील बागेतून पलायन केले.

समोरील घरामध्ये राहात असलेले वन खात्यातील वनरक्षक श्री. मणेर यांना लगेच संपर्क साधण्यात आला. त्यांनी बागेतल्या पावलांचे निरीक्षण केले असता बिबट्याची पाऊले असल्याची खात्री केली.
कनेडी बाजारपेठ नजीकच्या मनुष्य वस्तीच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार करीत असल्यामुळे नागरिकांत भीती व्यक्त केली जात आहे. तरी वन खात्याने बिबट्या वाघाचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे