मालवण,दि.१५ फेब्रुवारी
विज्ञानवादी थोर संत शिरोमणी गुरु रविदास यांची जन्मतारखेनुसार ६२७ वी जयंती सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवण शहराच्या वतीने मालवण शहरातील संतगुरु रविदास नगर व मालवण शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी मालवण तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगांवकर तालुका कार्यकारी मंडळाचे सल्लागार श्रीकृष्ण पाडगांवकर गुरुजी, मालवण प्रभागाचे अध्यक्ष घनश्याम चव्हाण मालवण शहराचे अध्यक्ष गणेश पाडगांवकर शहर सचिव देवेंद्र चव्हाण महिला प्रतिनिधी सौ. सुमन आडवलकर दीपक भिलवडकर
मंडळाचे उपाध्यक्ष महादेव आडवलकर, संतोष माणगांवकर, संजय भिलवडकर, संतोष चव्हाण, वैभव माणगांवकर, राजन माणगांवकर, सौ. रुपाली आडवलकर, चंद्रकांत माणगांवकर, नरेश चव्हाण सौ. प्रमिला माणगांवकर आदी व इतर उपस्थित होते
प्रारंभी ज्येष्ठ सल्लागार पाडगांवकर गुरुजी यांच्या हस्ते गुरु रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगांवकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी सुधाकर माणगांवकर यांनी संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती जन्मतारखेनुसार का करावी यासंदर्भात व गुरु रविदास हे विज्ञानवादी, समता, बंधुत्व व न्याय ह्या विचारांचे पाईक होते असे विचार मांडले. तर हरेश चव्हाण यांनी गुरु रविदास यांचे विचार स्वीकारण्याचे व त्याप्रमाणे वाटचाल करणे ही आज काळाची गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरसचिव देवेंद्र चव्हाण यांनी केले शेवटी प्रभाग अध्यक्ष घनश्याम चव्हाण यांनी आभार मानले