शिवजयंतीनिमित्त मालवणला १९ रोजी भव्य शोभायात्रा

मालवण,दि.१५ फेब्रुवारी 
मालवण येथील शिवराजेश्वर मित्रमंडळाच्यावतीने १९
फेब्रुवारी रोजी मालवण बंदरजेटी याठिकाणी शिव जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० वा. शिवज्योत सिंधुदुर्ग किल्ला ते मालवण बंदरजेटी अशी आणण्यात येणार आहे. ५.३० वाजता दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

या शोभायात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य सिंहासनारुढ मूर्ती, रथ यात्रा, मावळे, घोडे व हत्ती, सिंधुगर्जना ढोलपथक, मालवणी सुपरहिट रोंबाट, सिंधुदुर्गातील नामांकित डिजे, फटाक्यांची आतषबाजी, लहान गट व मोठा गट वेशभूषा स्पर्धा होणार आहे. या शोभायात्रेमध्ये असलेल्या चित्ररथांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा, दत्त दर्शन, श्रीराम अयोध्या देखावा, बाळूमामा दर्शन, बालाजी देखावा तसेच इतरही खास आकर्षणं असणार आहेत. स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे श्वेता जोशी, ऋतिका आचरेकर किंवा ७२१९८१६९८६ या क्रमांकावर द्यावीत. बंदरजेटी या ठिकाणी रात्री १० वाजता चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी कुडाळ यांचा शिवराज्याभिषेक सोहळा व पारंपरिक नृत्यमय डान्स शो होणार आहे. तरी या शिवजयंती उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे