दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार शेतकरी यांच्या काजूला दोनशे रुपये अनुदान मिळाले पाहिजे यासाठी १६ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा दिला इशारा

दोडामार्ग, दि. ११ फेब्रुवारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत काजू बी ला १८० पर्यंत दर दिला जात होता पण गेल्या चार वर्षात हा दर खाली उतरला आहे. ११० रूपये किलोला दर देवून शेतकरी काजू बागायतदार यांच्यावर एक प्रकारे अन्याय केला जात आहे. गोवा राज्यात काजूला योग्य हमीभाव दिला जातो. मग आमच्यावर अन्याय कशासाठी. येथील काजू बागायतदार यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकञ येत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार यांनी रविवारी बैठक घेऊन काजू बीला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे १६ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार यांची धरणे आंदोलन नियोजन संदर्भात
बैठक रविवारी दोडामार्ग गणेश मंदिरात पार पडली कृषी फळ संशोधन केंद्र येथील निवृत्त डॉ. मोहन भगवान, दळवी तसेच विलास सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार युवा तरुण वर्ग शेतकरी उपस्थित होते.