फोटोबाजी फेम गजानन राणेंनी परशुराम उपरकर यांचा इतिहास जाणून घ्यावा..!

फेसबुक व व्हाट्सअप्प वर व्हिडीओबाजी करून स्वतःची चमकोगिरी करणारे गजानन राणे हे स्वयंघोषित नेते..!

मागील दिड वर्षात स्वतःच्या गावात शाखा काढू न शकणाऱ्या पक्ष निरीक्षकांनी आधी स्वतःची पात्रता ओळखावी..अभय देसाई

दोडामार्ग, दि. ११ फेब्रुवारी 
काल मनसेच्या स्वयंघोषित पक्ष निरीक्षकांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात संघर्ष योद्धा म्हणून परिचित सर्व सामान्य जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे आहे असे प्रतिउत्तर मनसेचे माजी पदाधिकारी राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अभय देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे.मुंबईहून पार्सलने आलेल्या मनसेच्या या स्वयंघोषित कामगार नेत्याने जीजी उपरकर यांच्यावर टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर जिल्ह्यात स्वतः निवडणूक दाखवावी असे आव्हान देत फुकटचे सल्ले देण्याचे धंदे बंद करावेत असा इशारा दिला आहे. मागील दीड महिन्यांत उत्पादन शुल्क,सार्वजनिक बांधकाम व मटका जुगार फक्त याच विषयांवर निवेदने देऊन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकरवी नेमकी काय पोळी भाजली जातेय हे जिल्ह्यातील जनता जाणते.मनसेच्या जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तुमच्याच सल्ल्यांनी आरटीआय चा वापर मागील दीड महिन्यांत कुठे कुठे केलाय हे आधी तपासावे,गोरगरीब कष्टकरीं कामगारांच्या पोटावर मारून आपण किती पाकीटं मिळवली याची पोलखोल आम्हाला करायला लावू नका इशारा देखील त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.मागील दीड महिन्यांत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मटका,दारू,ओव्हरलोड वाहतूक आदीं व्यावसायिकांकरवी हफ्ते गोळा करून द्यायला निरीक्षकांनी सूचना दिल्याच्या पदाधिकाऱ्यांच्याच चर्चा आमच्याही कानावर आल्यात हे लक्षात ठेवा..पक्ष निरीक्षक जिल्ह्यात पक्ष वाढवायला आलेत की हफ्ते गोळा करायला याची पोलखोल करायला आम्हांस लावू नये.
मंदिरात दर्शनाला जाताना स्वतःचे चालतानाचे व्हिडिओ काढून फेसबुक व व्हाट्सअपवर शो ऑफ करणाऱ्या गजानन राणेंनी पक्ष निष्ठेच्या बाता मारू नयेत, प्रसंगी पार उघडे करून टाकू असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. आपल्यासारख्या बडव्यांनी मा.राज साहेबांसमोर खोटं आणि दिखाव्याचे चित्र दर्शवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे संघटनेचं आधीच वाटोळं केलंय, उगाच जिजींवर टीका करून स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला देखील अभय देसाई यांनी दिला आहे. मागील 40 वर्षात जिल्हाच्या राजकारणात प्रत्येक गावात पोचून श्री उपरकर यांनी जनतेच्या मनात आपले स्थान अबाधित ठेवले आहे म्हणून आजही जिल्ह्यातील न 80% मनसेचे कार्यकर्ते हे जिजींसोबत उभे आहेत हे विसरू नका असे प्रत्युत्तर सामाजिक कार्यकर्ते अभय देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.