युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)

माघी गणेश जयंती निमित्ताने युवा संदेश चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडले.माध्यमिक विद्यालय कनेडी येथे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, कलाशिक्षक प्रसाद राणे, मुख्याध्यापक सुमन दलवी, केंद्र प्रमुख उत्तम सुर्यवंशी, सरपंच बाबू सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, मयुरी मुंज, पवार, परिसरातील शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही चित्रकला स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत जिल्हाभरातून ३७६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता कनेडी बाजारपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप तांबे, नरेंद्र चिंदरकर, अजय सावंत, दयानंद गावकर, नितीन सातवसे यांनी विशेष मेहनत घेतली.