कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)
कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये झालेल्या कब बुलबुल आणि स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारात येथील विद्यामंदिर हायस्कूलने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
सिंधुदुर्ग भारत स्काऊटस् आणि गाईड्स आणि जिल्हा परिषद शिक्षण विमाग प -ाथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे तीन दिवसाचा निवासी जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहात आणि प्रतिसादात पार पडला. सदर मेळाव्यात बिद्यामंदिर माध्यमिक प्रशालेने शेकोटी कार्यक्रमामध्ये गाईडच्या मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामध्ये मुलीनी सादर केलेल्या अन्नपुर्णा, सरस्वती व महाकाली मातेच्या समूहनृत्याला उपस्थितांनी फार मोठी दाद दिली. या नृत्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तर शेकोटी कार्यक्रमामध्येच स्काऊटने द्वितीय क्रमांक, गॅझेट बनविणेमध्ये स्काऊटने द्वितीय तर गाईडने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तात्पुरता निवारामध्ये गाईडच्या चमूने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यामंदिरच्या या स्काऊट व गाईडच्या पथकाला कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी प रणा मांजरेकर, सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे तसेच स्काऊट गाईडचे इतर आजी-माजी शिक्षक तसेच इतर मान्यवर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यामंदिरच्या या मुलांना प्रशालेचे स्काऊट व गाईडचे मार्गदर्शक जे. जे. शेळके, विद्या शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेच्या या यशाबद्दल संस्था चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजय बळंजू मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका श्रीमती जाधव यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थ्यांतून अभिनंदन होत आहे.