कुडाळ,दि.१६ फेब्रुवारी
कवठी देऊळवाडी येथील पुलाच्या कामाचे रणजित देसाई यांच्या हस्ते भूमी पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आले.
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कवठी देऊळवाडी ते गावकरवाडी (दलित वस्ती)कडे जाणाऱ्या रस्त्यावर देऊळवाडी (जांभाचा वहाळ ) येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्याचे तात्कालिन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने या कामासाठी सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता या कामाचे आज रोजी जिल्हापरिषदेचे मा. अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली . यावेळी बोलताना रणजित देसाई यांनी सांगितले की कवठी गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही जिल्याचे विध्यमान पालकमंत्री खासदार नारायण राणे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपण कवठी गावाचा विकास करण्यासाठी कातिबंद्ध असल्याचे यावेळी सांगितले. या भूमिपूजन कार्यक्रमाला रणजित देसाई यांच्या सोबत अनिल (बंड्या )सावंत रुपेश कानडे, कवठी सरपंच स्वाती करलकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद नाईक, स्वाती राणे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय खडपकर, नारायण पडगावकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सदानंद बांदेकर यांच्यासह कवठी गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.