वायरी भूतनाथ गावातील घरेलू महिला कामगारांना स्मार्ट कार्डचे वाटप

मालवण,दि.१६ फेब्रुवारी

कामगार मंडळ सिंधुदुर्ग यांच्याकडे नोंदणी केलेल्या वायरी भूतनाथ गावातील ३४ घरेलू महिला कामगार लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्राची पराग माणगांवकर यांनी पुढाकार घेत आपल्या प्रयत्नातून महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा कामगार मंडळ यांच्याकडे या घरेलू कामगार महिलांची नोंदणी केली होती.

यावेळी स्मार्ट कार्ड वितरण प्रसंगी वायरी भूतनाथ उपसरपंच सौ. प्राची माणगावकर, देवानंद लुडबे, पराग माणगावकर, ममता तळगावकर, यांच्यासह घरेलू महिला कामगार लाभार्थी सौ. संचिता सदानंद धुरी, सौ. दिपाली दिगंबर धुरी, सौ. अक्षता अशोक धुरी, नम्रता परमानंद धूरत, सौ. पूजा प्रकाश धुरी, सौ. शिल्पा काशिनाथ मांजरेकर, रोहिणी रुपेश तळवडेकर, विश्रांती देवदत्त धुरी, सौ. स्वाती दत्तात्रय कुंभार, सौ. आरती आत्माराम मांजरेकर, सौ. रश्मी रामचंद्र गोलतकर, सौ. रसिका राजेंद्र करंगुटकर, वीणा विठ्ठल पाटकर, सौ. रसिका रवींद्र केळूसकर, ज्योती उदय तळवडेकर, सौ. प्रणाली हर्षद हळदणकर, अर्चना हरिश्चंद्र तळवडेकर यांच्यासह इतर लाभार्थी महिला उपस्थित होत्या.