कुडाळ ,दि.११ फेब्रुवारी(विठ्ठल राणे)
तालुका पत्रकार समितीचा ‘व्याधकार’ ग. म. भैय्यासाहेब वालावलकर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार दैनिक कोकणसाद चे पत्रकार नंदकिशोर मोरजकर, (सावंतवाड़ी), छायाचित्र पुरस्कार वैभव केळकर (देवगड़) , (कै.) वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार दैनिक तरुण भारत चे झाराप प्रतिनिधी भाग्यविधाता वारंग यांना जाहीर झाला.
कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे दरवर्षी ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर यांच्या नावाने जिल्हा पत्रकार पुरस्कार व जिल्हा छायाचित्र पुरस्कार दिला जातो. तर (कै.) वसंत दळवी स्मृती नावाने ग्रामीण पत्रकार पुरस्कार ग्रामीण भागातील पत्रकाराला देण्यात येतो. पुरस्कार वितरण सोहळा व नियोजनाची बैठक नुकतीच हॉटेल लाइमलाइट येथे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष आनंद मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी प्रमोद म्हाडगुत यांना मिळाल्याने, निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार प्राप्त झाल्याने या दोघांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष वैशाली खानोलकर, भुषण देसाई, सचिव काशीराम गायकवाड़, खजिनदार विठ्ठल राणे, अजय सावंत ,चंद्रकांत सामंत, प्रमोद ठाकूर, राजन नाईक,गुरु दळवी ,भाग्यविधाता वारंग आदी उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग कुडाळ पत्रकार समितीचे जिल्हास्तर पुरस्कार जाहीर नंदकिशोर मोरजकर,वैभव केळकर. भाग्यविधाता वारंग