शाहीर विशारद डॉ.आझाद नायकवडी यांच्या पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन!
देवगड,दि.११ फेब्रुवारी
देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि१९फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे तसेच या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा समाजाचे देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.या वेळी सचिव केदार सावंत,अविनाश सावंत,किसन सूर्यवंशी योगेश राणे,दयानंद पाटील,प्रवीण सावंत, मनोहर भगत,उपस्थित होते.
या निमित्त आयोजित केलेले कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी ८.३० ते ९.३० छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी ९.३० ते ९.४५ मराठा समाज कार्यालय उदघाटन,सकाळी ९.४५ ते १०.०० ध्वजारोहण,१० ते ११.३० कार्यक्रम स्थळ ते देवगड किल्ला मिरवणूक
सकाळी ८ ते सायं. ६ वाजेपर्यंत ढोल पथक, सायंकाळी ४.३० ते ५.३० ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा,सायं५.३० ते ६.३० पोवाडा, भारताच्या राष्ट्रपतींसमोर सलग पाच वेळा शाहिरी पोवाडा सादर करण्याचा सन्मान लाभलेले कोल्हापूर संस्थांनचे’ दरबार शाहीर शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी कोल्हापूर ,यांचा” डफाच्या बोलावर” हा शाहिरी पोवाडे स्फूर्ती गीते व लोकगीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी ६.३० ते ७.०० रील मेकिंग स्पर्धा ३५० वर्ष शिव अभिमानाची (छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित) आयोजित केली आहे सायंकाळी ७ ते ७.३० मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नाव नाव नोंदणी बंटी कदम ९४२२५८४५१९/ योगेश राणे ९४२३३०४०५० यांच्याकडे नोंदवावी तसेच मान्यवरांचा सत्कार आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे .सायंकाळी ७.३० ते १० यावेळी डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा संदीप नाईक धुरे बापर्डे देवगड बुवा संतोष आरावकर तुळसवडे राजापूर यांच्यामध्ये रंगणार आहे.या शिवजयंती उत्सवाचे आयोजन निखिल लंच होम शेजारी व्यासपीठावर आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन देवगड तालुका मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.