आचरेत सुरु झालेले क्लासेस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भवितव्य घडवणारे :नारायण राणे
आचरा ,दि.११ फेब्रुवारी
आचरा विद्यानगरी येथे राजन गुळगुळेनी सुरु केलेले क्लासेस हे जिल्ह्याचे उज्ज्वल भवितव्य घडवणारे आहेत. ज्या उपक्रमाची कोकणाला गरज होती असा स्तुत्य उपक्रम राबविण्याचे काम गुळगुळे यांनी केले आहे. विध्यार्थीनी आधुनिक टेक्नॉलिजीची ओळख करून घ्यावी आधुनिक टेक्नॉलिजीची ओळख विध्यार्थीना व्हावी म्हणून मी ओरोस येथे आधुनिक टेक्नॉलिजी सेंटर सुरु करत आहे. आचरा सारख्या छोट्या टोकाच्या गावाला अशी आधुनिक टेक्नॉलिजीची माहिती देण्याच्या कामाची सुरवात होत आहे त्याचा आपणा सर्वांनी स्वीकार करावा असे आवाहन
न्यू इंग्लिश स्कूल आचरा या विद्या संकूलात विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण मिळून विद्यार्थी स्वावलंबी बनावेत या हेतूने धी आचरा पीपल्स असोशिएशन मुंबईचे अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांच्या कल्पनेतून आणि आचरा गावचे सुपुत्र राजन गुळगुळे व कुटूंबिय यांच्या आर्थिक व तांत्रिक योगदानातून सुरु होत असलेल्या शिवराम उर्फ दाजी गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचराच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय लघू सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
यावेळी धी आचरा पीपल्स असोसिएशन मुबंई चे अध्यक्ष डॉ.प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदीप परब, इकबाल काझी, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, शालेय समितीच्या अध्यक्ष निलिमा सांवत,आचरा कॉलेज चेअरमन संजय मिराशी, इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष निलेश सरजोशी, तंत्र व कौशल्य विकास केंद्र आचराचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, इंग्लिश मिडियम लोकल कमिटी खजिनदार परेश सावंत, कमिटी सदस्य राजन पांगे, तात्या भिसळे, अर्जुन बापर्डेकर, सुरेश गावकर, विदयानंद परब, जेम्स फर्नाडीस, मुख्याधापक गोपाळ परब, मायलीन फर्नाडिस, नितीन बर्वे, ऋषीं बर्वे, ट्रेनर अमित खेडेकर तसेच भाजपा पदाधिकारी अशोक सावंत, भाई मांजरेकर, तलुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच संतोष मिराशी, राजन गावकर, हनुमत प्रभू, मंगेश गावकर, जयप्रकाश परुळेकर, डॉ प्रमोद कोळंबकर, अभय भोसले, सचिन हडकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर,पंकज आचरेकर,हर्षदा पुजारे, श्रुती सांवत, चंद्रकांत कदम, बाजेल फर्नांडीस, शेखर कांबळी, प्रफुल्ल प्रभू, उदय घाडी व अन्य मान्यवर हजर होते.
मुलाच्या विकासासाठी काम करणाऱ्या गुळगुळेचा सार्थ अभिमान
कोकणावर बऱ्याच जणांनी पुस्तके लिहली, भाषणे केली, निसर्गाचे कौतुक केले पण त्यातील कोणीही कोकणाचा विकास, आर्थिक प्रगती कशी होईल आणि त्यांचे अर्थव्यवस्थेत परिवर्तन कसे घडेल यांचे मार्गदर्शन केले नाही. मात्र इतक्या वर्षात यासाठी काम करणारे ऐकमेव आढळलेले राजन गुळगुळे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. गुळगुळे यांनी स्वतःच्या किशात हात घालून मुलाच्या विकासासाठी काम चालू केले आहे. त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच मी आज खास आचरे गावात आलो असल्याचे राणे म्हणाले.
कोकणाला पायाभूत सुविधा निर्माण केल्याचे काम केले
बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी माझ्यावर टाकल्यावर मी कोकणात आलो त्यावेळी कोकणची स्थिती फार वाईट बिकट होती. म्हणव्या तशा मूलभूत सुविधा नव्हत्या. आज मात्र मी कायापालट करून सर्व पायभूत सुविधा दिल्या. पूर्वीच्या काळी पर्यटणासाठी सुविधाअभावी कोणी कोकणात न फिरकत नव्हते आज मात्र चित्र बदलले असून कोकणात पर्यटकांची रिघ लागली आहे. मोठं मोठया कंपन्या आपली फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्यासाठी जागेची मागणी करत आहे.
विध्यार्थीनी मोठी होण्यासाठी जिद्द बाळगावी .
विध्यार्थी नी चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे. आपले ध्येय्य निश्चित करावे नेहमी मोठे होण्याची जिद्द बाळगावी त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी. चांगल्याला चांगले म्हणणे उपक्रम चालू करावा. माणुसकीचे अलंकार तुमच्या स्वभावातून आले पाहिजेत. माणुसकीचे, संस्कृतीचे, कर्तबगारीचे, प्रगतीचे वेगवेगळे ज्ञान आत्मसात करण्याचे अलंकार बाहेर येणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रचंड जिद्द बाळगा असे आवाहन राणे यांनी केले.
यावेळी धी आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी बोलताना चौथ्या शैक्षणिक संकुलाची सुरुवात होत असल्याचे सांगितले. संस्था उत्कर्षासाठी आणि विध्यार्थीच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी राबवलेल्या अनेक योजनाची माहिती त्यांनी दिली. इमारतीच्या नूतनिकरणासाठी स्वखर्चाने वर्गखोलीचे मॉडेल रूम बनऊन त्याप्रमाणे इतर देणगीदार यांच्या सहकार्याने इतर वर्ग खोल्याचे नूतनी करण कारण्यात आले असल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी बोलताना राजन गुळगुळे यांनी कोरोना काळात आलेल्या विपत्ती मुळे अनेकांना आर्थिक विवंचनेचा त्रास सहन करावा लागला. भविष्यात नोकरया कमी होत आहेत. म्हणून शाळेतून शिक्षण घेउन बाहेर पडणारा विद्यार्थी स्वावलंबी बनवा यासाठी गुळगुळे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या भागातिल विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनावा या हेतूने आपण हा अभ्यास क्रम सुरु करत असल्याचे सांगितले.