मालवण,दि.१८ फेब्रुवारी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी दिल्यानंतर मी नऊ वेळा आमदार कधी झालो हे मलाच समजले नाही. जगात कोणी केला नाही असा विक्रम एका भंडारी माणसाने केला आहे. नऊ वेळा आमदार झालो तरी पक्षाने मला न्याय दिला नाही, तरीही मी मागणारा माणूस नाही, असे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले असून मंत्रीपद नाही मिळाले तरी हाजी हाजी करणारा भंडाऱी नाही असे प्रतिपादन मुंबईतील आमदार आणि मालवणचे सुपुत्र आमदार कालिदास कोळंबकर यांनी मालवण येथे बोलताना केले.
मुंबई सारख्या महानगरात नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल मालवणचे सुपुत्र, भंडारी समाजाचे आमदार कालीदास कोळंबकर यांचा सत्कार सोहळा सकल भंडारी हितवर्धक संस्था व भंडारी समाजाच्या वतीने आज सायंकाळी दैवज्ञ भवन मालवण येथे संपन्न झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आम. कालिदास कोळंबकर हे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चर, टुरीस्ट बोर्डचे चेअरमन श्री आशिष पेडणेकर यांच्या हस्ते आम. कोळंबकर यांचा शाल श्रीफळ, सन्मानपत्र व आंबा रोप देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन ज्येष्ठ शिक्षक रवींद्र वराडकर यांनी केले. यावेळी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, माजी जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, रत्नागिरी मंडळाचे अध्यक्ष राजीव किर, मामा माडये, मालवण तालुकाध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, भाई गोवेकर,
ममता वराडकर, पूजा करलकर, अर्चना मीठबावकर, पल्लवी खानोलकर, सुनील नाईक, महेश जावकर, अजित गवंडे, भाई मांजरेकर, जयप्रकाश परुळेकर, भाई सारंग, बाबल कवटकर, यतीन खोत, भाऊ साळगावकर, प्रसन्न मयेकर आदी उपस्थित होते.
यावेळी आशिष पेडणेकर म्हणाले, आम. कालिदास कोळंबकर यांना आता मंत्रीपद मिळाले पाहिजे ही आपलली सर्वांची इच्छा आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भंडारी समाजाची माहिती त्यांना सांगू व भंडारी समाजाला मंत्रीमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी करू, असेही पेडणेकर म्हणाले. यावेळी नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी विचार मांडत भंडारी समाजातून शिवरायांचे पहिले आरमार प्रमुख भंडारी मायनाक, राघोजी शेठ किर यांनी जसे कार्य केले, विक्रम केले तसेच आता आधुनिक काळात आम. कोळंबकर यांनी नऊ वेळा आमदार बनून विक्रम केला आहे, ते कॅबिनेट मंत्री शंभर टक्के होतील असे सांगितले. यावेळी रवींद्र तळाशीलकर, भाई गोवेकर, महेश जावकर, हेमंत करंगुटकर, शिल्पा खोत, राजीव किर आदी व इतरांनी विचार मांडले.
यावेळी आम. कालिदास कोळंबकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील आमदारांची जेव्हा बैठक घेतली तेव्हा त्यांनी सर्वात ज्येष्ठ आमदार कोण असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे नाव सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलताना मी नऊ वेळा आमदार झालो तरी पक्षाने मला न्याय दिलेला नाही, तरीही मी मागणारा माणूस नाही, असे सांगितले. यावर पंतप्रधान मोदी यांनी मला दिल्लीत चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले, असेही आम. कोळंबकर म्हणाले. भंडारी समाज बांधवानी एकत्र येऊन एकजूट दाखवावी, मालवण येथे पूर्ण ताकदीनीशी भंडारी भवन उभारूया, यासाठी लागणाऱ्या निधी बाबत मी नियोजन करतो, असेही आम. कालिदास कोळंबकर म्हणाले.
यावेळी मालवण व्यापारी संघातर्फे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नितीन तायशेटे, बाळू अंधारी, नाना साईल, गणेश प्रभूलकर यांनी आम. कोळंबकर यांचा सत्कार केला. तसेच इतर समर्थ बांधवानीही सत्कार केला. यावेळी भंडारी समाजातील युवा कार्यकर्ते म्हणून हेमंत शिरगांवकर यांचा आम. कोळंबकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुनील नाईक यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भंडारी समर्थ बांधव उपस्थित होते.