सावंतवाडी,दि.११ फेब्रुवारी
गाडीत लाकुड भरत असताना भला मोठा ओंडका अंगावर कोसळल्यामुळे गोठोस येथील विनायक पांडुरंग तेजम वय 42 याचा मृत्यू झाला. याप्रकरणी क्रेन निष्काळजीपणे चालविल्याने चालक श्रीकृष्ण बाळकृष्ण मोर्या वय 32 रा गोठोस याच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ओवळीये (ता. सावंतवाडी) येथे घडली. त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की
ओवळीये श्री देव गांगो मंदिरालगतच्या रस्त्यापलीकडे क्रेन च्या सहाय्याने गाडीत जळाव लाकूड भरीत होते. यावेळी श्रीकृष्ण बाळकृष्ण मौर्य हे क्रेन चालवीत होते यावेळी त्यांनी आपल्या ताब्यातील क्रेन पुरेशी काळजी न घेता निष्काळजीपणे ऑपरेट करून हौद्यात लाकडाचे औंडके चढवीत असताना लाकडाचा औंडका बेल्ट मधून निसटून खाली उभा असलेला विनायक पांडुरंग तेजम याचे डोक्यावर पडून त्याचा मृत्यू झाला याबाबतची खबर येथील पोलीस ठाण्यात दिलीप राऊळ यांनी दिली त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास श्री भालेराव करीत आहेत