ग्रामपंचायत पडेल येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन

देवगड,दि.११ फेब्रुवारी

तालुका विधी सेवा समिती- देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी गिर्ये व रामेश्वर ग्रामपंचायत येथे हे शिबीर होणार आहे. तसेच २७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत पडेल येथे मोबाईल व्हॅन लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गिर्ये ग्रामपंचायत येथे २६ रोजी सकाळी १० वा. आयोजित शिबिरात अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. गिरीष भिडे हे मार्गदर्शन करणार आहेत. रामेश्वर ग्रामपंचायत येथे सकाळी ११.३० वा. आयोजित शिबिरात अॅड. संगीता कालेकर, अॅड. अन्वी कुळकर्णी, अॅड. विना लिमये हे मार्गदर्शन करणार आहेत. २७ रोजी सकाळी १०.३० वा. ग्रामपंचायत पडेल येथे आयोजित मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये पॅनेलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग देवगडचे श्रीमती एन. बी. घाटगे व पॅनेल सदस्य म्हणून अॅड. मैथिली खोबरेकर हे काम पाहणार आहेत. या मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. बी. घाटगे यांनी केले आहे.