सावंतवाडी,दि.११ फेब्रुवारी
अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे नेमळे येथे एका पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रीज परिसरात कलयामलया मंदिराच्या परिसरात घडली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्म्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान संबंधित तरुणाची अद्याप पर्यत ओळख पटलेली नाही. मात्र त्याच्याकडे मिळालेले साहित्य लक्षात घेता तो वेडसर असावा, असा अंदाज पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वेगाने जाणार्या अज्ञात वाहनाने त्यांला धडक दिली असून तो जागीच ठार झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केला आहे तर त्याच्याकडे आढळलेल्या गाठोड्यात फाटके कपडे आणि पेन्सिल,कागद अशा वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तो वेडसर असण्याची शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.