कणकवली दि.११ फेब्रुवारी
कणकवली वरवडे फणसनगर येथील रहिवासी,सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सदाशिव उर्फ आप्पा सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिगंबर सावंत यांच्या कुटुंबीयांची वरवडे येथील घरी भेट घेवून विचारफुस केली,त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांत्वन केले.यावेळी त्यांच्यासमवेत माजी सभापती प्रकाश सावंत व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.