कलमठ गावडेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गायत्री ब्राह्मण ज्येष्ठ मंडळ व गायत्री युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)

कलमठ गावडेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त १३ फेब्रुवारी रोजी ७ वाजता बुवा दुर्वास गुरव विरुद्ध बुवा व्यंकटेश नर यांचा डबलबारी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता गणेश मूर्तीचे मिरवणुकीने आगमन. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता आरती, ९ वाजता गणेश पूजन, १० वाजता सत्यनारायण पूजा, १२ वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजल्यानंतर भजने, त्यानंतर बुवा दुर्वास गुरव विरुद्ध बुवा व्यंकटेश नर यांचा डबलबारी भजनांचा सामना होणार आहे.

१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर व रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. रेकॉर्ड डान्स स्पर्धेला प्रथम पारितोषिक ५ हजार , द्वितीय ३ हजार,
तृतीय २ हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे.तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री ब्राह्मण ज्येष्ठ मंडळ व गायत्री युवा प्रतिष्ठान
कलमठ गावडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.