केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे जनतेला आवाहन”विकसित समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा व भारत” चर्चा सत्रात विविध विकासाची कवडे झाली खुली
कणकवली दि.११ फेब्रुवारी(भगवान लोके)
जनता हीच माझी संपत्ती आहे.हीच माझी लक्ष्मी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध करायचा आहे.त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी ही मोहीम हाती घेवून काम करूया. सर्वांगीण शिक्षण देवून क्रियाशील शिक्षित पिढी घडवूया. नवनवीन रोजगार,उद्योग उभे करण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी तुमची मला साथ हवी आहे. सहकार्य हवे आहे. पाठींबा हावा आणि मार्गदर्शन ही हवे आहे.असे काम करत असताना पक्ष,जात, धर्म मी कधी पाहत नाही.सर्वांना सोबत घेवून काम करूया.सिंधुदुर्ग जिल्हा हा समृद्ध व्हावा हा संकल्प करून पुढे चालुया असे आवाहन केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत “विकसित समृद्ध सिंधुदुर्ग जिल्हा व भारत” या विषयांवर चर्चा सत्र प्रहार भवन येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार डॉक्टर प्रसाद देवधर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी ,भालचंद्र मराठे अशोक करंबेळकर, प्रज्ञा ढवण, नामदेव जाधव मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री आदेश सह सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवर व ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणले,चागल्या मार्गाने पैसे मिळविण्यास लाज बाळगू नका. कशाने जीवनात प्रगती येते त्या गोष्टी आत्मसात करा.गरिबिवर मात कशी करायची यावर बोलून मी थकलो आहे. मी राजकारणी असलो तरी प्रथमतः उद्योजक आहे.मी जपान जर्मनी मध्ये फिश निर्यात करतो. हॉटेल इंडस्ट्रीत मी काम करतो आहे.मात्र इतर मच्छिमारांना माझ्यासारखा व्यवसाय करा म्हणून सगळी व्यवस्था करून दिली तरीही आपले लोक ती कामे करत नाहीत. मी आता गो शाळा बांधत आहे.शेळी मेंढी आणि पोलस्ट्री फार्म करतो आहे.शेन गोमूत्र यापासून रंग बनविला जाणार आहे. गाय ही लक्ष्मी आहे. घर चालविण्यात एक गाय खूप मदत करू शकते.तुम्ही सुद्धा करावा असा उद्योग. जिल्हातील लोक अशा गोष्टींना प्राधान्य देत नाही. सिंगापूर,बँकॉक मध्ये समुद्री माशांवर प्रक्रिया करून प्रोडक बनविले जाते. अशा वस्तू एटीएम मधून भेटत असतात.
मी पोलस्ट्री फार्म केले,गॅरेज चालवले,ट्रक ,टेंपो चालविला आता सुद्धा मी व्यवसाय करतो मी थांबलो नाही. माझ्या खात्यातील ६ कोटी ६८ लाख उद्योग आहेत. ते राज्यात वाढले पाहिजे. माझ्या खात्याचा निधी शभर टक्के खर्च केला.त्याचा फायदा घ्या.
यावेळी समाजातील बुद्धिजीवी मंडळींनी आपले विचार मांडले यात.
दादा कुडतरकर;
कागद निर्मिती कारखाना व्हावा अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली.
अशोक करंबेळकर;
ट्रेनिंग बाहेरची लोक घेतात मात्र इथली लोक एम ई से मी चे घेत नाहीत.
भालचंद्र मराठे;
वेस्टन घाट आहे त्याचा पर्यटनासाठी वापर करावा आणि वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण होईल.देशाचे शैक्षणिक धोरण बदलले पाहिजे.ज्येष्ठांच्या आदर कसा करावा हे मुलांना कळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचा योग्य तो वापर करावा. रेल्वे सवलत ज्येष्ठांना पुन्हा सुरू करावी. ज्येष्ठांसाठी एक खिडकी चालू करावी.ज्येष्ठांचा सामाजिक कार्यात समावेश करावा.
डॉ.साळुंखे
डिजिटल हेस्थ चांगले झाले. ६० वर्षे वयानंतर इन्शुरनस दिला जात नाही.केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आणलेली व्यवस्था स्थानिक लोकांनी वापरले पाहिजे. स्किल बेस शिक्षण घेण्यास लोकांना कळत नाही.पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रयकृत बँका मधून सेवा दर्जेदार मिळावी. मोदी सरकार मुळेच २८८ कोटी लोकांना कोरोणा लस दिली. हिंदू आहोत म्हणजे मुस्लिम विरोधी आहोत अशी धारणा करणे चुकीचे आहे.
डॉ.मिलिंद कुलकर्णी
एम ई से मी मध्ये ६ कोटी पेक्षा जास्त उद्योग येतात त्याचा आपल्या लोकांनी फायदा घेतला पाहिजे. राणे साहेबांच्या खात्याचा राष्ट्रपतींनी उल्लेख लोकसभेत केला. त्यांचे काम किती मोठे आहे हे सांगितले त्या खात्याचा फायदा आपल्या तरुण तरुणींनी घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सर्वेश नारकर
मोदींनी अमृत काळ म्हणून संकल्पना मांडली तेव्हा विश्वास बसत नव्हता. आज देशाची तरुण पणाची वर्षे ही १५/२५ हा कालावधी आहे. त्यामुळे आम्ही जग दिवाळखोरीत असताना सुद्धा भारताची आर्थिक स्थिस्थी चढत्या क्रमाने आहे. पुढचे शतक भारताचे असणार आहे. क्रयशक्ती देशाची झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मी देशासाठी काय करतो याचे आत्मपरीक्षण करावे. विश्वगुरु बनलो म्हणजे झाले नाही तर
* डॉ.प्रसाद देवधर
निसर्गाने समृद्ध असलेल्या प्रदेशाला
दोन रुपये किलो तांदूळ देवून गरिबी कमी होणार नाही.अंतर्मुख होवून पहा निवृत्ती नंतर आपण काय केले. जिल्हा परिषद ने १२०० बायोगॅस टार्गेट होते. आता ते ३०० इतके केले का ? धूर मुक्त सिंधूर्दुग करावा. ग्रामीण भागात ज्याच्याकडे गायी,म्हैशी आहेत त्यांनी बायोगॅस करावा. नरेगा मध्ये बायोगॅस आणि गायींचे गोठे निर्मिती करावा.सह्याद्री पट्यात शेळी मेंढी पालन कॉरिडॉर सुरू करा.
बॉक्स
भास्कर जाधव आमदारकीची उमेदवारी आणि १५ लाख दिले,तो माणूस कृतघ्न निघाला
भास्कर जाधव ला बाळासाहेब ठाकरे यांचेकडे मी नेले. उमेदवारी दिली.१५ लाख निवडणुकीसाठी खर्चा साठी दिले मात्र तो माणूस कृतघ्न निघाला. तो माझ्या बद्दल असे बोलतो तेव्हा वाईट वाटते किमान उपकार तरी विसरू नयेत माणसाने अशा शब्दात श्री नारायण राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेवर भाष्य केले.