माघी गणेश जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा १३ फेब्रुवारी रोजी आयोजित

सावंतवाडी दि.१२ फेब्रुवारी

सावंतवाडी खासगीलवाडा शाळा क्रमांक चार येथे माघी गणेश जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ४वा. तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सायंकाळी सहा वाजता संदेश सावंत झाराप यांचा भजन कार्यक्रम होईल. रात्री आठ वाजता महापुरुष भजन मंडळ सबनिसवाडा यांचे भजन होईल व रात्री नऊ वाजता एमजे डान्स अकॅडमी चा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सर्वांनी तीर्थप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय विरनोडकर यांनी केले आहे.