सावंतवाडी दि.११ फेब्रुवारी
श्री देव आदीनारायण देवस्थान परुळे येथे रथसप्तमी उत्सवानिमित्त दि.१४ ते १६ फेब्रुवारी रोजी विधीवत पूजा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता विधिवत पूजा कार्यक्रम होतील त्यानंतर सायंकाळी चार ते सहा वाजता डॉ. तेजस्विनी देसाई, दाजी गोसावी व कुमार पवन प्रभू यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे .त्यानंतर ह भ प विनोद बुवा चारी यांचे कीर्तन होईल
तसेच दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी विधिवत कार्यक्रम होतील आणि सायंकाळी सहा वाजता कुमार प्रणव मेस्त्री नेरूर यांचे पखवाज व सोलो वादन होईल. रात्री आठ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प संदीप बुवा मांडके (जेजुरी) व संकेत बुवा भोळे (वडोदार गुजरात ) यांची कीर्तनाची जुगलबंदी होईल.
तसेच दि.१६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी निमित्त उत्सव होईल. तेजोनिधी भगवान आदीनारायण रथादिष्ट महापूजा होईल .या रथसप्तमी निमित्त आयोजित कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव आदीनारायण देवस्थान परूळे यांनी केले आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग श्री देवआदीनारायण देवस्थान परुळे येथे रथसप्तमी उत्सवानिमित्त १४ ते १६ फेब्रुवारी रोजी...