कणकवली येथील शेतकरी संघात मिरची महोत्सवाचा शुभारंभ
कणकवली दि.१२ फेब्रुवारी(भगवान लोके)
शेतकरी सहकारी खेल्दी विक्री संघ मर्या. कणकवलीच्या माध्यमातून शेतक-यांसाठी आयोजीत मिरची महोत्सवाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.हा महोत्सव समता बझार जवळ होत आहे. ग्राहकांनी दर्जेदार मिरची खरेदीसाठी शेतकरी संघाला प्राधान्य द्यावे असे आवाहन बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी केले.
यावेळी संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत , संचालक प्रशांत सावंत, संचालिका विनीता बुचडे, लीना परब, स्मिता पावसकर, व्यवस्थापक गणेश तावडे, सहा. व्यवस्थापक राजेंद्र सावंत, संदीप तोरस्कर, कविता राणे,राजन परब व गुरुनाथ पावस्कर , किशोर राणे तसेच शेतकरी संघाचे कर्मचारी उपस्थित होते.
या मिरची महोत्सवात गुंटूर नंबर १ व २. ,सुवर्ण बैडगी ,किरण बैडगी , बैडगी नं. १,२ व ३ ,काश्मीर बैडगी,देठ काढलेली बैडगी मिरची आमचेकडे माफक दरात उपलब्ध आहे. तसेच सर्व प्रकारचे मसाला सामान उपलब्ध केल्याचे असल्याचे व्यवस्थापक गणेश तावडे यांनी सांगितले.