काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा आमदारकीचा राजीनामा

विधानसभा अध्यक्षांकडे दिला राजीनामा

कणकवली दि.१२ फेब्रुवारी(भगवान लोके)

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत काही आमदार भारतीय जनता पार्टीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.