जि.प. शाळा बोर्डवे नं २ च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला “छावा’ चित्रपट

कणकवली दि.२२ फेब्रुवारी 

छावा’ सिनेमा संपू्र्ण जगभरात गाजत आहे. पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये ‘छावा’ पाहण्यासाठी गर्दी होत आहे. शुक्रवारी जि.प. शाळा बोर्डवे नं २ च्या मुलांना देखील छावा चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासातील माहिती मिळावी. या हेतूने जि.प. शाळा बोर्डवे नं २ मधील मुलांना कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिर येथे चित्रपट पहाण्यासाठी नेण्यात आले होते. मुलांनी चित्रपट पाहून समाधान व्यक्त केले. तसेच इतिहासातील काही माहिती समजून घेतली. यावेळी जि.प. शाळा बोर्डवे नं २ चे मुख्याध्यापक रविंद्र जाधव, उपशिक्षक संतोष गरुड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सीमा शिंदे आदी उपस्थित होते.