कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडे माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची मागणी..
कणकवली दि.१२ फेब्रुवारी(भगवान लोके)
कणकवली शहरात काही बुलेट धारक व तत्सम टू व्हीलर चालक आपल्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक खोडसाळपणा करून कर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे. कणकवली शहराच्या सर्विस रोड वरून उड्डाणपूल गेल्यामुळे तो आवाज सर्वत्र पसरतो. अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. तरी आपण संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक व कठोर कारवाई करावी,अशी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडे केली आहे.