बांदा येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

हिंदू एकता मंच व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्यातर्फे राबविले गेले स्वच्छता अभियान

 बांदा,दि.२३ फेब्रुवारी

बांदा येथे हिंदू एकता मंच व प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथील कर्मचारी यांनी संयुक्तपणे राष्ट्रसंत,थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी केली. याप्रसंगी सर्वांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला.आयुष्यभर शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गाडगे महाराज, दिवसा गावं झाडून स्वच्छ करत तर रात्री आपल्या किर्तनातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा,अज्ञान यावर प्रहार करणारे थोर समाजसुधारक अर्थात संत होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन यावेळी माजी सैनिक निलेश सावंत यांनी केले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथील परिसर स्वच्छ व निर्जंतुक करीत संत गाडगेबाबा यांची जयंती स्वच्छतेचा संदेश देत साजरी करण्यात आली. या अभियानात निलेश सावंत, माजी सैनिक,गुरु कल्याणकर, भाजपा बांदा मंडल क्रीडा संयोजक,राजाराम उर्फ आबा धारगळकर,उपसरपंच,हेमंत दाभोळकर,सामाजिक कार्यकर्ते,विराज परब, बांदा शहर मराठा समाज अध्यक्ष,प्रशांत बांदेकर,ग्रामपंचायत सदस्य,बाबा काणेकर, भाजपा शहर अध्यक्ष, केदार कणबर्गी, भाजपा पदाधिकारी, राकेश केसरकर,भाजपा पदाधिकारी अभिजीत देसाई यांच्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गजानन सारंग, वैद्यकीय अधिकारी, सुप्रिया रंगसुर,आरोग्य सहायिका, शांती कदम,आरोग्य सेविका, दिनेश देसाई, लिपीक, प्रेमा कदम, आरोग्य सेविका, सागर पाटील,परीचर, दिनेश शेर्लेकर, स्वयंसेवक व नागरीकांनी भाग घेतला.