पाळणेकोंड धरणावरील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर मध्ये माघी गणेश जयंती उत्सव १३ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी,दि.१२ फेब्रुवारी
सावंतवाडी नगरपरिषद पाळणेकोंड धरणावरील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर मध्ये माघी गणेश जयंती उत्सव उद्या मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
श्री सिद्धिविनायक गणपतीची सकाळी आठ वाजता विधीवत पूजा होईल तर ठीक बारा वाजता गणेश जन्मोत्सव साजरा केला जाईल.यानंतर आरती महाप्रसाद असे कार्यक्रमाची नियोजन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
गणेश भक्त भाविकांनी महाप्रसाद तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.