बांदा,दि.२३ फेब्रुवारी
(कै.) परशुराम नाईक व कै. लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ अंकुश माजगावकर व कुटुंबियांनी येथील नट वाचनालयात पुरस्कृत केलेल्या शालेय निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०२४ च्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, अंकुश माजगावकर, संचालक शंकर नार्वेकर, अनंत भाटे, जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, प्रकाश पाणदरे, शिक्षक जे डी पाटील, सौ. स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, ओंकार राऊळ, अमिता परब आदिसह शिक्षक, पालक, वाचक उपस्थित होते.
पाचवी ते सातवी गटात भिकाजी देसाई (खेमराज हायस्कुल बांदा), निधी राठोड (खेमराज हायस्कुल बांदा), कौशल राणे (जिल्हा परिषद शाळा इन्सुली) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. ऋतुजा बांदेकर (खेमराज हायस्कुल बांदा) व आराध्या देसाई (माध्यमिक विद्यालय डेगवे) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.
आठवी ते दहावी गटात वैष्णवी वाडकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), आर्या राणे (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), स्वरा सातार्डेकर (दिव्यज्योती इंग्लिश स्कुल डेगवे) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. चिन्मई चव्हाण (खेमराज हायस्कुल बांदा) व मितेश मयेकर (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कुल बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.