कलमठमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
कणकवली दि.२३ फेब्रुवारी
शिवजयंती उत्सव समिती, कलमठच्यावतीने श्री देव काशीकलेश्वर मांड येथे शिवजयंती साजरी केली. यानिमित्त वक्तृत्व, बुद्धिबळ, जोर बैठका मारणे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे.
वक्तृत्व स्पर्धा ः इयत्ता पहिली ते चौथी गट-1. हेरंब जयराम राऊळ (एसएम हायस्कूल), 2. अखिलेश विजय घोरपडे (एसएम हायस्कूल), 3. पार्थ गणेश मोडक (जि. प. शाळा कलमठ बाजारपेठ नं. 1). इयत्ता पाचवी ते आठवी गट – 1. आयुष बागवे (विद्यामंदिर प्रशाला), 2. संतोषी सुशांत आळवे (विद्यामंदिर प्रशाला), 3. तेजस्विनी रामाकांत देवलकर (एसएम हायस्कूल).
बुद्धिबळ स्पर्धा ः 1. रुद्रांश प्रमोद राय, 2. यश संदेश पवार, 3 (विभागून) मुग्धा विकास साईल, गौरेश श्रेयस ताटशेटे. जौर बैठका मारणे स्पर्धा ः लहान गट – 1. अखिलेश संतोष राणे (सरवंजे फिटनेट सेंटर, फोंडा), 2. शुभम धनंजय हळदिवे (सरवंजे फिटनेस सेंटर, ),3.संदीप अशोक परब (एसआरके फिटनेस सेंटर, कलमठ). उत्तेजनार्थ- अमोल अनंत तेली(सरवंजे फिटनेस सेंटर), मनोज कृष्णा गावकर (एसआरके फिटनेस सेंटर). मोठा गट – 1. शुभम धनंजय हळदिवे (सरवंजे फिटनेट सेंटर), 2. ओमकार हनुमंत लाड (एसआरके फिटनेस सेंटर), 3. सिद्धेश सुरेश गुरव (एसआरके फिटनेस सेंटर), उत्तेजनार्थ-दीप नंदकुमार भोगले (सरवंजे फिटनेस सेंटर), विश्वराज विजय सातपुते (एसआरके फिटनेस सेंटर) यांनी यश संपादन केले. स्पर्धांच्या आरंभी शिवरायांच्या प्रतिमेला सुनील नाडकर्णी व डॉ. स्वप्निल राणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अर्जुन राणे,अनंत हजारे, तनोज कळसूलकर,दिनेश लाड,गिरीश धुमाळे,विनय खोचरे, अण्णा मठकर, विनोद कोरगावकर,संजय खोचरे, नीलेश महेंद्रकर, संदीप कांबळी, बाळू मेस्त्री, श्रीकांत बुचडे, किरण हुन्नरे, विलास गुडेकर,महेश लाड, हरी रावराणे यांच्यासह शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुशांत राऊळ, पी. व्ही. कांबळे, नितीन पेडणेकर, नितीन उर्फ आबा मेस्त्री, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, नितेश भोगले, प्रदीप सावंत, सिकंदर मेस्त्री, सागर गावडे, सुंदर कोरगावकर, निश्चय हुन्नरे
यांनी मेहनत घेतली.
चौकट
चित्तथारारक मैदानी खेळ
एसएसएस योद्धा१+पथक, बिडवाडी यांनी लाठीकाठी,तलवारी बाजी,दांडपट्टा, भाला आणि पाश यासह अन्य शिवकालीन चित्तथारारकमैदानी खेळांचे सादरीकरण केले. हे खेळ पाहण्यासाठी शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.