कलमठ-बिडयेवाडी येथे रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

रक्तदान हेच श्रेष्ठदान..चा मंडळाने दिला संदेश ; गणेश जयंती निमित्त सामजिक बांधिलकीतून आयोजन

कणकवली दि.१२ फेब्रुवारी(भगवान लोके)

कलमठ-बिडयेवाडी ओम साई देवस्थान कमिटी यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यानी रक्तदान केले.समाजात रक्तदान हेच श्रेष्ठदान..चा मंडळाने वतीने संदेश देण्यात आला.

ओम साई देवस्थान कमिटी, कलमठ-बिडयेवाडी येथील गणेश मंदिरात रक्तदान शिबिराचे मंडळाचे विश्वस्त उदय नाडकर्णी,अजित पवार ,अध्यक्ष संजय पुजारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले .यावेळी पत्रकार भगवान लोके, माजी सरपंच धनश्री मेस्त्री,संतोष मेस्त्री ,संदीप म्हाडगुत,यल्लप्पा मस्तमर्डी,
अनुप वारंग,निनाद नाडकर्णी,गजानन लाड,श्री.कुबल ,ज्ञानेश्वर यादव,भूषण पवार,सेजल मस्तमर्डी,आदित्य कांदळगावकर,अविनाश राणे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत रक्तपेढी पथकाच्या माध्यामातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.या पथकामध्ये डॉ.विद्या शिंगारे,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्राजक्ता रेडकर, अधिपारिचारीका मानसी बागेवाडी,रक्तपेढी सहाय्यक अनिल खाडे,वाहन चालक अस्लम शेख यांनी सेवा दिली.यावेळी २१ रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

१३ फेब्रुवारी २०२४ रोजी गणेश जयंती निमित्त सकाळी ७ वा : श्री चरणी अभिषेक पुजा,सकाळी ९ वा. : सत्यनारायण महापुजा,दुपारी १२ वा. : महाआरती, तिर्थप्रसाद,दुपारी १ वा. : महाप्रसाद,सायं. ४ वा. : सुस्वर भजने,सायं. ५ वा. : हळदी कुंकू,सायं. ६ वा. : लकी ड्रॉ सोडत,सायं. ७ वा. : भजन दिव्या महीला भजन मंडळ जानवली,रात्री ९ नंतर : रेकॉर्ड डान्स होणार आहेत, तरी या धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम साई देवस्थान कमिटी, कलमठ-बिडयेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.