कणकवली दि.२३ फेब्रुवारी
२३ फेबुवारी : दागिने चोरीप्रकरणात पोलीस कोठडीत असलेला प्रीतम देविदास गायकवाड (वय 35) याची कोठडीची मुदत संपल्याने त्याला सोमवारी येथील न्यायलयात हजर केले जाणार आहे. एसटी बस व रेल्वे गाड्यांमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे सोन्याचे दागिने चोरीच्या कणकवलीत घटना घडल्या होत्या. अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत वांद्रापाडा येथे कणकवली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वषेण सिंधुदुर्ग विभागाच्या संयुक्तपणे केलेल्या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित आरोपी प्रीतम गायकवाड याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या इतर साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली होती.