चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी केली. यासह भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतावरील टेन्शन कमी झालं आहे. तर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. इमाम उल हक याने अप्रतिम कॅच घेत श्रेयस अय्यर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. श्रेयसने 67 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 56 धावा केल्या.
टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध 36 षटकांमध्ये 2 विकेट्स गमावून 200 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताला विजयासाठी आता आणखी 42 धावांची गरज आहे.
विराट कोहलीने 27 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर फोर ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलंय.
टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. उपकर्णधार शुबमन गिल 46 धावा करुन आऊट झाला आहे. अब्रार अहमद याने शुबमनला क्लिन बोल्ड केलं. अब्रारने टाकेलला बॉल पाहून विराट कोहलीही चकित राहिला.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने 287 डावात ही कामगिरी केली. विराटने 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिंगल घेत 14 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
टीम इंडियाने 10 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 64 धावा केल्या आहेत. उपकर्णधार शुबमन गिल 35 आणि विराट कोहली 6 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर त्याआधी कर्णधार रोहित शर्मा 20 धावा करुन माघारी परतला.
पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी याने टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. शाहीनने कर्णधार रोहित शर्मा याला पाचव्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर क्लिन बोल्ड केलंय. रोहितने 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 20 रन्स केल्या.
कर्णधार रोहित शर्मा याने दुसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर नसीम शाह याला कडक सिक्स ठोकला आहे. टीम इंडियाच्या डावातील हा पहिला सिक्स ठरला आहे.
टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिली ही सलामी जोडी मैदानात आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे.
पाकिस्तानने 49.4 षटकात सर्व गडी गमवून 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान भारतासाठी वाटते तितकं सोपं नाही. कारण या खेळपट्टी चेंडू खूपच संथ गतीने येत आहे. त्यामुळे आक्रमक फटकेबाजी करणं कठीण होतं.
पाकिस्तानला नसीम शाहच्या रुपाने आठवा धक्का बसला आहे. कुलदीप यादवने आपल्या स्पेलमध्ये तिसरी विकेट घेतली.
सलमान अघा आणि शाहीन आफ्रिदी या दोघांना बाद करत कुलदीप यादवने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं. पण हॅटट्रीक घेण्याची संधी हुकली.