आंबोली हिरण्यकेशी तिर्थक्षेत्रावर महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्याचे नियोजन

सावंतवाडी दि.२४ फेब्रुवारी
आंबोली हिरण्यकेशी तिर्थक्षेत्रावर महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आंबोली हिरण्यकेशी हे तिर्थक्षेत्र महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे.
येत्या बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र उत्साह आहे. या उत्सवाला पुर्वसंध्येला प्रारंभ होईल. तद्नंतर भल्या पहाटे तिर्थक्षेत्रावर स्नान, अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी हजारो पर्यटक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात. यांची तयारी सुरू केली आहे.