देवगड किल्ला येथील उभारण्यात आलेल्या भव्य रंगमंचाचे उदघाटन-अध्यक्ष नंदकुमार घाटे

देवगड,दि.१२ फेब्रुवारी
देवगड किल्ला येथील उभारण्यात आलेल्या भव्य रंगमंचाचे उदघाटन देवगड किल्ला गणेश मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.माघी गणेश जयंती निमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या रंगमंचावर करण्यात
आले आहे.
यावेळी ट्रस्ट उपाध्यक्ष शिवराम निकम,सचिव अशोक।गोळवणकर,खजिनदार केदार तेली,सदस्य गुरुनाथ वाडेकर,राजेश निकम,रमेश कोयंडे, प्रवीण गोळवणकर,यशवंत भोवर,चेतन कोयंडे, संतोष प्रभू,तसेच अन्य सदस्य,ग्रामस्थ उल्हास मणचेकर,चंद्रकांत पाळेकर,शरद भाटकर ,संतोष बिरजे,शामराव पाटील,दिनेश पारकर,अंकुश गोळवणकर ,आनंद वाडेकर व अन्य उपस्थित होते.

श्री गणपती मंदिर देवगड किल्ला या ठिकाणी मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वा. अभिषेक व पूजन सकाळी८ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी १० वाजता महाआरती सकाळी ११ वाजता सुश्राव्य स्थानिक भजने, १२ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वा. माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत ,महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार “गाथा महाराष्ट्राची” हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री गणपती मंदिर न्यास देवगड किल्ला यांच्यावतीने करण्यात आले आहे.