नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
देवगड,दि.१२ फेब्रुवारी
देवगड जामसंडे नगरपंचायत च्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे एकूण ४१ कोटी ५२ ,लाख नव्वद हजार बारा रुपये चे अंदाजपत्रक वाचन करण्यात येऊन त्यामध्ये अखेर शिल्लक १२ ,कोटी ८९ लाख,६१ हजार बारा रुपयाचे शिलकीचे अंदाजपत्रकास सोमवार दि.१२ फेब्रुवारी च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी सर्वानुमते देण्यात आली.
देवगड जामसंडे नगरपंचायत च्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे एकूण ४१ कोटी ५२ ,लाख नव्वद हजार बारा रुपये चे अंदाजपत्रक वाचन करण्यात येऊन त्यामध्ये अखेर शिल्लक १२ ,कोटी ८९ लाख,६१ हजार बारा रुपयाचे शिलकीचे अंदाजपत्रकास सोमवार दि.१२ फेब्रुवारी च्या विशेष सभेत मंजुरी सर्वानुमते देण्यात आली.
देवगड जामसंडे नगरपंचायत २०२४-२५ अर्थसंकल्प विशेष सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्य मिताली सावंत ,बांधकाम सभापती तेजस मामघाडी, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, मुख्याधिकारी सूरज कांबळे नगरसेवक नगरसेविका अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत नगरपंचायत सभागृहात पार पडली,
यात सन २०२४-२५ च्या ४१ कोटी ५२ लाख,९० हजार १२ रुपयांचे अंदाजपत्रकात महसुली जमा,४६ कोटी ८८लाख,९ हजार,भांडवली जमा,२५ कोटी,१लाख,७० हजार,एकूण जमा,२९ ,,कोटी ७०लाख,५९ हजार,खर्च तपशील महसुली खर्च ४५ ,कोटी,३२ ,लाख,९ ,हजार,
भांडवली खर्च,२४ ,कोटी १० ,लाख,एकूण खर्च २८ कोटी,६३ लाख,२९ ,हजार एवढा नमूद केला आहे.
त्याचबरोबर आरंभीची शिल्लक ११ कोटी ८२ लाख,३१ हजार १२ एवढी असून एकूण जमा २९ कोटी,७० लाख,५९ हजार ,एकूण खर्च २८ कोटी ६३ लाख,२९ हजार एवढा आहे.त्यानुसार अखेर शिल्लक १२ कोटी ८९ लाख,६१ हजार १२ रुपये एवढी मांडण्यात आली आहे.