कणकवलीत बंद घर फोडू सोन्याचे दागिने लंपास

कणकवली दि.२४ फेब्रुवारी

शहरातील नाथ पै नगर परिसरातील बंद असलेल्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दागिने व 10 रुपयांची रक्कम असा 3 लाख 5 हजारांचा माल लंपास केला. हा प्रकार रविवारी 23 फेब्रुवारीला उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, नाथ पै नगर येथे डाॅ. महाडेश्वर यांच्या दवाखान्याच्या मागील सुहास देसाई यांचे घर आहे. सुहास देसाई व त्यांची पत्नी सुनंदा देसाई या काही दिवसांपूर्वी मुंबई गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी 15 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत रात्री या बंद घराच्या खोलीमध्ये समोरील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेड खाली असलेल्या कपाटातील चवीने कपाट खोलले. त्यानंतर कपाटातील साडेचार तोळे सोन्याचा हार, 5 ग्रॅमच्या दोन बांगड्या, 3 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 3 ग्रॅमची चेन असे एकूण 6 तोळ्याचे दागिने आणि 10 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 5 हजार मुद्देमाल लंपास केला. त्याच घरातील भाडेकरू नीलेश राणे रविवारी सकाळी तेथे गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घर मालकांशी संपर्क साधून माहिती दिली. चोरट्यांनी दागिने व रोकड लंपास केल्यानंतर कपाटातील साहित्य त्या ठिकाणी फेकून दिले. याबाबत सुनंदा सुहास देसाई (70, रा. नाथ पै नगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.