कणकवली दि.२४ फेब्रुवारी
शहरातील एसटी बस व रेल्वेमध्ये चढणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारा संशयित प्रीतम देवदास गायकवाड (35) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संशयित प्रतीम गायकवाड याला कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वांद्रापाडा-अंबरनाथ येथून 19 फेब्रुवारीला ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर पोलिसांना त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.