कणकवली दि.२४ फेब्रुवारी
खारेपाटण शिवाजी पेठ येथील एेतिहासिक किल्ले खारेपाटणावरील प्रचीन दुर्गादेवी मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञातांचा असफल ठरला. ही घटना रविवार 23 रोजी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपाराच्या सत्रात मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने तोडला. मात्र, दान पेटीतील रक्कम लंपास करणाचा चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला. चोरीचा प्रकार मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी मंगेश गुरव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. मात्र, या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.