सागर वाडकर यांच राहत्या घरी निधन

सावंतवाडी,दि.१२ फेब्रुवारी
येथील सागर वाडकर यांच आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. ते गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर उपरलकर स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सुत्रसंचलन करत. गायन व सुत्रसंचलन मध्ये ते भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सावंतवाडी येथे लता लॉज कॉर्नर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सव कार्यक्रमात ते सूत्रसंचालन करत होते. भारदस्त आवाज आणि चुटकुले सांगण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. अनेक सूत्रसंचालकांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी सूत्रसंचालक म्हणून सावंतवाडी, सिंधुदुर्गात नावलौक कमावले होते. त्यानंतर काही काळ त्यांनी कुरिअरचा व्यवसाय केला होता.