देवगड,दि.२६ फेब्रुवारी
शासकीय निधी लोकांच्या करातून प्राप्त होतो त्याचा चांगला विनियोग कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण देवगड येथील नव्याने बांधण्यात आलेले अद्ययावत शासकीय विश्रामगृह आहे.देवगड विकासात्मक प्रतिमा उंचावेल यासाठी या विश्रामगृहाचा वापर होईल हे महत्वाचे आहे.असे प्रतिपादन नाम.नितेश राणे यांनी देवगड येथे
आयोजित केलेल्या शासकीय विश्रामगृह लोकापर्ण सोहळ्यात बोलताना केले .नाम.नितेश राणे यांच्या हस्ते हा लोकापर्ण सोहळा पार पडला.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड यांच्या अखत्यारीतील देवगड तालुक्यातील देवगड येथील शासकीय विश्रामगृह नुतनीकरण व सुधारणा करणे या कामाचा लोकापर्ण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय ,बंदरे विकास मंत्री नाम.नितेश राणे यांच्या शुभहस्ते बुधवारी सकाळी देवगड येथे संपन्न झाला.यावेळी माजी आम.अजित गोगटे,बाळ खडपे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,प्रकाश राणे चेअरमन सदाशिव ओगले,भाजप जिल्हा सरचिटणीस,संदीप साटम जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर,तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, सरचिटणीस शरद ठुकरुल,बंड्या नारकर तालुका प्रमुख विलास साळसकर ,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,नगरसेविका प्रणाली माने,बुवा तारी ,तहसीलदार रमेश पवार ,माजी सभापती सुनील पारकर, नंदू देसाई भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी जि प सदस्य संजय बोबंडी,मिलिंद माने, उल्हास मणचेकर,अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सा. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड,उपविभागीय अभियंता श्रीनिवास बासुतकर,कनिष्ठ अभियंता शुभम गायकवाड उपस्थित होते.या प्रसंगी नाम.नितेश राणे याचे स्वागत सन्मान सा. बा. विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व अन्य अधिकारी वर्ग यांच्या वतीने करण्यात आला.
या निमित्ताने या अद्ययावत विश्रामगृहाचे बांधकाम करणारे मक्तेदार ओमटेक असोसिएट्स यांचा विशेष सन्मान नाम.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.