सावंतवाडी, दि.१२ फेब्रुवारी
विलवडे येथील पुरग्रस्थानी नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण यांची मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट घेऊन नुकसान भरपाई बाबतीत जाब विचारला.
सन २०१९ ते २०२१ पर्यंत विलवडे गावात नदीच्या पुरामुळे अनेक घरे, शेतमांगर, भात शेती, वाहनांचे, शेती साहित्य यांचे मोठे नुकसान झाले यासंदर्भात दि.२६ जानेवारी २०२४ रोजी विलवडे ग्रामस्थ तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उपोषणास बसले होते यावेळी तहसीलदारांनी आश्वासन दिलं होतं की आपली नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही यासंदर्भात आज तहसीलदार यांची भेट गेल्या असता तहसीलदार अनुपस्थित होते. म्हणून नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण यांची भेट घेतली आणि त्यांना या विषयी माहिती विचारले तर त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी श्रीमती शेवडे ही व्यक्ती त्यावेळी हे काम पाहत होत्या त्यांनी त्यापूर्वी सर्व घोळ घातलेला आहे त्यामुळे माहिती देण्यास विलंब होत आहे परंतु आम्ही या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांना रुपये देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर तहसीलदार श्री श्रीधर पाटील हे आले व त्यांची भेट घेण्यात आली व त्यांनी तशा सूचना दिल्यात की ज्या लोकांना नुकसान भरपाई मिळाली त्यांची यादी बनवा व ज्यांना मिळाली नाही त्यांची यादी बनवा तसेच शेतमांगर काही जणांची नावे आहेत तर ती नवीन यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे पाठवून त्यांना मंजुरी घेऊ त्याचप्रमाणे तत्कालीन तलाठी विलवडे श्रीमती भक्ती सावंत यांना बोलून घेऊन त्यांनी केलेल्या पंचनामाची चौकशी करू असे संबंधितांना सांगण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तसेच विलवडे ग्रामस्थ माजी उपसभापती कृष्णा सावंत, मनसेचे माजी शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, मधुसूदन दळवी, रुक्मिणी दळवी, सखाराम सावंत, याजमेराज गोन्सालवीस, भीमसेन गावकर, आनंद दळवी, लक्ष्मण सावंत, अशोक गोडबोले, शुभम सावंत,प्रतिभा दळवी, प्रभाकर दळवी, सिताराम दळवी, रवींद्र सावंत, शितल दळवी, बाबाजी दळवी, विराज सावंत, भाई सावंत, नरेंद्र दळवी, श्रीराम दळवी, जगन्नाथ दळवी, रामदास गावकर, बाळकृष्ण सावंत, महेश नाईक, गोपाळ दळवी, अरुण दळवी असे एकूण ६६ शेतकरी होते. सदर नुकसानी भरपाई मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले लवकरात लवकर आपली यादी आपल्यापर्यंत पोहोचू सद्यस्थिती निधी आपल्याकडे उपलब्ध आहे ते लवकरात लवकर आपल्या खात्यात जमा करून तसे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.