सावंतवाडी दि.१२ फेब्रुवारी
कोकण मराठी साहित्य परिषद चे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी स्वतः लिखित केलेले शिवबा नाटक सावंतवाडी येथील महा सांस्कृतिक महोत्सवात सादर करण्यात आले याबद्दल त्यांचा कोकण मराठी साहित्य परिषद च्या जिल्हा व सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शाल व श्रीपाद देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, लेखिका उषा परब, उपजिल्हाधिकारी सोनटक्के, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड संतोष सावंत, जिल्हा खजिनदार भरत गावडे,उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, अँड नकुल पार्सेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव मंगेश पांचाळ, मंदार म्हस्के आदी उपस्थित होते
कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी हे नाटक स्वतः लिहिले असून त्याने संभाजीची भूमिका ही साकारली आहे, हे नाटक सर्वांच्या हृदयाला भिडणारे आहे अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी गौरव केला.
Home आपलं सिंधुदुर्ग शिवबा नाटक सावंतवाडी येथील महा सांस्कृतिक महोत्सवात सादर केल्यामुळे डॉ.प्रदीप ढवळ यांचा...