शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

:देवगड,दि.२७ फेब्रूवारी

दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील महाशिवरात्री उत्सवास श्री भैरी भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी भेट देऊन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच भाविक शिवभक्त याना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.या निमित्त अतुल रावराणे याचा श्री देव कुणकेश्वर प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपाध्यक्ष गणेश वाळके यांचा शाल श्रीफळ देऊन अतुल रावराणे यांनी सत्कार केला.यावेळी महेश रावराणे,सुहास गुरव,नंदा वाळके,ट्रस्ट उपाध्यक्ष गणेश वाळके,सदस्य संतोष लाड धुळाजी काळे उपस्थित होते.